कधी कधी गोष्टी मनाविरुद्ध घडतात
हो,
असे कधीतरी होईल खरे सांगायचे तर,
तू यशपथावर पायपीट करत असशील
आणि तो मार्ग तुला भासेल फार दूरवर,
कधी पैशाची खूपच कमी असेल
आणि कर्ज तुझ्यावर असेल फार,
मनमोकळेपणाने हसावे वाटले जरी तुला
तरी केवळ उसासा तू टाकू शकणार,
अडचणींवर मात करण्यासाठी,
तुझी लागत असेल जरी कस,
हव तर, विश्राम कर थोडा, परंतु
हार तू मानू नकोस.
आयुष्य विचित्र आहे, होय,
आहे त्यामधे
खूप गुंतागुंतीचे आणि वळणाचे क्षण,
आपल्या सर्वांना जगतांना मिळतात
पुष्कळ अनुभव आणि शिकवण,
बरेचदा अपयशालादेखील घ्यावी लागते माघार,
आपण म्हणतो, बघ तो बाजी जिंकलाच
असतां,
जर धैर्याने लढत संकटाला दिले असते
त्याने उत्तर,
म्हणून, तू खचून जाऊ नकोस,
जरी यशाची गती
भासे तुला हळुवार,
यशस्वी तू नक्की होशील,
सहन करून घे संघर्षांचा फक्त हा अजून एकच वार.
संघर्ष करणारा हतबल होऊन करतो
हार शेवटी स्वीकार,
मात्र,
नेमके तेंव्हा,
जेंव्हा त्याच्या हाती लागणारच होते यशाचे करंडक पात्र,
उशीरा उमगते त्याला,
की संपतच आली होती
अपयशाची अंधारी काळरात्र,
किती जवळ होते त्याच्यापासून,
विजयाचे सोनेरी मुकुट आणि किर्तीपत्र.
यश हे खरतर अपयशातही दडून बसले असते
हे काळजीपूर्वक निरीक्षणानंतर येते लक्षात,
जसे,
संशयाच्या काळया ढगाला सुद्धा
आशेची चंदेरी असते झाक,
यशाच्या किती जवळ पोहोचला होतास तू ,
तुला नाही काही अंदाज,
यश जवळच असेल कदाचित
दूरवर असण्याचा जरी होत असेल तुला भास,
म्हणून लढत रहा जेंव्हा सर्वात जास्त
सोसावा लागेल नशीबाचा कठीण मार,
कारण जेंव्हा गोष्टी असह्य व अशक्य दिसतात
तेंव्हा मुळीच घ्यायची नसते माघार ॥
—————————————————————

No comments:
Post a Comment