विलगता असे...
हर्षोल्हासाने ओतप्रोत
आनंदलहरी
घरभर तरंगतात
आणि गुणगुणतात
तु माझा...
मी तुझी...
लेकरांच्या संचयीकेत
नाण्यांच्या किणकिणीचा
नाद जणू...
देहाग्नीवर झेललेली
पावसाच्या थेंबांची
शीतल सर जणू...
हिमापरी थंडगार!!
कोण बरे असावा
या चराचर सृष्टीचा कर्ता??
तोच जो आपल्यातील
कणाकणाला करतो
संरक्षित...
माझ्या
अन तुझ्यासह देखील...
घराच्या खिडकीचे
घराशी नाते फार जुने
गल्ली तुडवतांना
अनवाणी पायांची
एक वेदना झाली
मनातील गझल...
त्या बोळीतून
खुणावीत गरुडाचे
आर्त क्रंदन
बेघर व्यक्तिला
डोक्यावर छत्र
देण्याचे अनाठाई
आव्हान...
कुंठीत अंत:मनाचे
मायाजाळ
अभेद्य बंदीगृहात
ऐहिक सुखाच्या...
सत्याचा आरसा तो
क्षितीजापल्याड आहे.
Prof.Savita Deogirkar
No comments:
Post a Comment